spot_img
spot_img
spot_img
spot_img

काँग्रेसच्या विकासविरोधी भूमिकेमुळे मौद्याचा विकास खुंटला नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके यांचा पत्रकार परिषदेत आरोप; ५७ विकासकामांचे ठराव नामंजूर केल्याचा दावा

 

काँग्रेसच्या विकासविरोधी भूमिकेमुळे मौद्याचा विकास खुंटला

नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके यांचा पत्रकार परिषदेत आरोप; ५७ विकासकामांचे ठराव नामंजूर केल्याचा दावा

📍 मौदा, तालुका प्रतिनिधी

मौदा शहराच्या सर्वांगीण विकासाला काँग्रेसच्या नगरसेवकांच्या भूमिकेमुळे अडथळा निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्ष प्रसन्ना राजा तिडके यांनी केला. विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रितपणे सकारात्मक भूमिका घेणे अपेक्षित असताना, काँग्रेसचे नगरसेवक जाणीवपूर्वक विकासकामांना विरोध करीत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तिडके पुढे म्हणाले की, जनतेने दिलेल्या बहुमताचा अनादर करून मौदा शहराच्या प्रगतीला खीळ घालण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. देश व राज्यात भाजपची सत्ता असून, मौदा-कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मौद्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायतीच्या ठरावांची आवश्यकता असते, मात्र काँग्रेसचे बहुमत असल्याने हे ठराव मंजूर होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला.

२१ ऑगस्ट रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत एकूण ५७ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये लोकवस्तीत असलेले मटण मार्केट स्थलांतरित करणे, कन्हान नदी चौपाटीचे सौंदर्यीकरण, पूरसंरक्षण भिंतीचे बांधकाम, मौदा टी-पॉइंट व केसलापूर टी-पॉइंट येथे प्रवेशद्वार उभारणे, स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, जयस्तंभ चौक ते टाका परिसरातील नाली व रस्ता दुरुस्ती, बाजार चौक ते केसलापूर रस्ता दुरुस्ती, एनटीपीसी सोलर लाईट योजनेला परवानगी, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम तसेच विविध प्रभागांतील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश होता.

मात्र, या सर्व विकासकामांचे ठराव काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर नामंजूर केल्याचा आरोप नगराध्यक्ष तिडके यांनी केला. त्यामुळे मौदा शहरातील नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षांना धक्का बसला असून, हा जनतेच्या विश्वासघाताचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.

विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे – तिडके यांचे आवाहन

शहराच्या विकासासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून उपाध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. उपलब्ध निधीचा योग्य वापर करून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे ही सर्व लोकप्रतिनिधींची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, मौदा शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन नगराध्यक्ष प्रसन्ना राजा तिडके यांनी केले.

या पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष उमेश गभणे, भाजपचे नगरसेवक मोरेश्वर सोरते, रमेश कुंभलकर, राहुल पोटभरे तसेच सौ. दीपिका पोटभरे उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

1xBet app download APK BD: Complete guide

How to Download the 1xBet App (APK) in Bangladesh – Complete Guide Why Choose the 1xBet Mobile...

مراجعة شاملة لـ تحميل وان اكس بت في الإمارات

ما هو تحميل وان اكس بت؟كيف تختار منصة تحميل وان اكس بت موثوقة؟الخطوات الأولى للتسجيل في تحميل وان اكس بتإنشاء حساب سريعالتحقق من الهوية...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!